Posts

Image
 दिपा मिठबावकर   अर्चित चे क्लाइंबिंग स्पर्धे साठी  चिपळूण ला जायचे नक्की झाले , पर्यायाने माझे जाणे आलेच.  त्या दरम्यान वैभव आणि आदिती चा मेसेज आला होता की आमचा ग्रुप  वेळास ला जाणार आहे, येणार का ...turtle hatching  बघायला ?   आता पर्यंत हे कासव फेस्टिवल  ऐकून होते , बघू असे म्हणून मी विसरून हि गेले . चिपळूण ला जायचे नक्की झाले आणि मी बुकिंग साठी ट्रॅव्हल एजेंट ला फोन केला ..कोविड चा विचार करता शिवशाही ला प्रेफरेन्स दिला . पण आयत्या वेळी बुकिंग नसल्याने शिवशाही रद्द झाल्याचे समजले. आता ऐनवेळी एसटी शिवाय पर्याय नव्हता. वैभव चा reminder आला ..वेळास ला येतेय ना ?  तसेही मी चिपळूण ला चालले च होते, मग वेळास ला पण जायचे का ...मन ओढ घेऊ लागले . पण चिपळूण स्पर्धेनंतर पुढे ३ दिवस काय करायचे ?  चिपळूण वरून परत यायचे आणि पुन्हा निघायचे.. की चिपळूण हुन पुढे निघायचे आणि गुहाघर फिरायचे ? तिथून पुढे वेळास ..! वाह ,स्वतःवरच  खुश झाले मी 😀 बऱ्याच काळाने सोलो traveling चा योग !  बस्स ,ठरले तर ...!   गुहाघर ल...