दिपा मिठबावकर
अर्चित चे क्लाइंबिंग स्पर्धे साठी चिपळूण ला जायचे नक्की झाले , पर्यायाने माझे जाणे आलेच. त्या दरम्यान वैभव आणि आदिती चा मेसेज आला होता की आमचा ग्रुप वेळास ला जाणार आहे, येणार का ...turtle hatching बघायला ? आता पर्यंत हे कासव फेस्टिवल ऐकून होते , बघू असे म्हणून मी विसरून हि गेले . चिपळूण ला जायचे नक्की झाले आणि मी बुकिंग साठी ट्रॅव्हल एजेंट ला फोन केला ..कोविड चा विचार करता शिवशाही ला प्रेफरेन्स दिला . पण आयत्या वेळी बुकिंग नसल्याने शिवशाही रद्द झाल्याचे समजले. आता ऐनवेळी एसटी शिवाय पर्याय नव्हता. वैभव चा reminder आला ..वेळास ला येतेय ना ?
तसेही मी चिपळूण ला चालले च होते, मग वेळास ला पण जायचे का ...मन ओढ घेऊ लागले . पण चिपळूण स्पर्धेनंतर पुढे ३ दिवस काय करायचे ? चिपळूण वरून परत यायचे आणि पुन्हा निघायचे.. की चिपळूण हुन पुढे निघायचे आणि गुहाघर फिरायचे ? तिथून पुढे वेळास ..! वाह ,स्वतःवरच खुश झाले मी 😀 बऱ्याच काळाने सोलो traveling चा योग ! बस्स ,ठरले तर ...! गुहाघर ल होम स्टे ची सोय झाली . दुसर्या दिवशी वनाज बस स्टॉप वर दुपारी २.३० वाजता ची एसटी होती . सकाळी बॅग पॅक करून लवकर लंच केला . दुपारी १.३० वाजला तरी विनायक चा ऑफिस कॉल संपेना ..शेवटी भावा ला फोन केला ..नशिबाने त्याच्या कामातून थोडा वेळ काढून स्टॉप वर सोडायला येतो म्हणाला . तरी निघे पर्यन्त २ वाजले ..अंतर तसे ५-७ मिनिटाचे.. नेमका रस्त्यात ट्रॅफिक जाम ... भावाने थोडी रॉन्ग साइड टू व्हीलर काढली आणि तेवड्यात समोरून एक जण जोरात येऊन धडकला 🙆. शेवटी मिंनतवारी ने तिथून सुटका करून घेतली आणि स्टॉप वर पोचले. पुढच्या ५ च मिनिटात महाड बस आली ..आणि ड्रायवर च्या मागची माझी आवडती सीट मिळाली.
महाड बस स्टँड वर उतरले आणि समोरच चिपळूण बस लागलेली दिसली, काय नशीब ..आवडती सीट रिकामी 😊 संध्याकाळी ७ च्या सुमारास चिपळूण स्टँड आणि तिथून रिक्शा ने डेरवण गाठले. पुढचे दोन दिवस स्पर्धा एंजॉय करण्यात गेले. अर्चित ला सिल्वर मिळाले 😀 सकाळी चिपळूण स्टँड वरुन गुहाघर एसटी पकडली ..पुन्हा ठरलेली सीट..एकंदर प्रवास छान सुरू होता . दुपारी लंच च्या वेळेत गुहाघर ला पोचले . स्टँड पासून ५ मिनिटाच्या अंतरावर परचुरे होम स्टे ला पोचले. टिपिकल कोकणी घर आणि हाकेच्या अंतरावर समुद्र...अहाहा, अजून काय हवे ! संध्याकाळ होताच हॉटेल वाल्याने सांगितल्या प्रमाणे मशिदी च्या मागच्या बाजूने बीच वर पोचले...कासव घरटे आणि पिल्ले पहायला..पण तिथे फॉरेस्ट अधिकारी कोणी नसल्याने नुसतेच घरटी पाहुन समुद्र किनार्याने चालायला सुरुवात केली. फारच विलोभनीय संध्याकाळ ..किनार्यावरील सुरुचि बाग ..पायाला जाणवणारा मऊ वाळू चा सुखद स्पर्श आणि शुभ्र सुंदर फेसाळणार्या लाटा ! एवढ्यात चालता चालता काही अंतरावर कासव दिसले ... धावत च सुटले मी...जवळ पोचले तर भले मोठे कासव ..पहिल्यांदा पहात होते ...पण काही सेकंदात च हा आनंद मावळला, मासेमारी बोटीच्या पंख्याला धडकुन मृत झालेली किनार्यावर आलेली कासव मादी होती ती 😓! काही वेळातच मावळणार्या सूर्याचे प्रतिबिंब डोळ्यात साठवत काहीशा निराश मनाने मी परत फिरले.
![]() |
| ( गुहाघर ) |
![]() |
| (मृत पावलेले कासव) |
दुसर्या दिवशी सकाळी वेळास ( प्रसिद्ध कासवांचे गाव) जाण्यासाठी निघाले. गुहाघर स्टँड हून एसटी ने धोपावे ला पोचले तेथून धोपावे फेरी बोट ने दाभोळ बंदर गाठले. मग पुढे दापोली ला जायला टमटम ( 8-10 जन मावतील अशी मोठी रिक्षा) मिळाली.
तासा भराने दापोली स्टँड वर पोचले. दापोलीत वेळास चे तज्ञ कासव मित्र मोहन उपाध्ये भेटणार होते. पुढचा दापोली ते वेळास ८० किलोमीटर चा प्रवास उपध्येंच्या बाइकवर सुरू झाला, जोडीला त्यांचा ज्ञान संग्रह ...! माड -पोफळीच्या बागा आणि समुद्रातीराने बाइकवर मार्गक्रमण करण्याची मजा काही और च होती 😇.
![]() |
| (हर्णे बायपास..सुवर्ण दुर्ग चे विहंगम दृश्य) |
त्या दिवशी रात्री माझे पुण्याचे फ्रेंड्स ही वेळास ला पोचले. मग काय कासव, निर निराळे पक्षी प्राणी यांच्या महितीपटाची मैफल उशिरा पर्यन्त रंगली ( वेळास ला आमचा मुक्काम उपाध्ये यांच्या घरी होता ). सकाळी लवकरच म्हणजे ६.१५च्या सुमारास मोठ्या उत्सुकतेने आम्ही कासव पिल्ले पहायला समुद्रावर पोचलो . वन विभाग अधिकार्याने बांबुची टोपली वर करताच इवली इवली १९ पिल्ले धडपडत बाहेर आली, अलगद ती पिल्ले वाळू घातलेल्या टब मध्ये घेऊन आमची वरात या पिल्लांना आपल्या घरी (समुद्रात) सोडण्यास निघाली. तुरुतुरु निघालेली ही पिल्ले मधून च आपली नाजुक मान वर करून पाण्याच्या दिशेचा अंदाज घेत मार्गक्रमण करताना पाहून पुन्हा एकदा निसर्गाची किमया प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली ( बर्याचदा या पिल्लांच्या डोळ्यावर वाळू चिकटलेली असते अशावेळी मान वर करून ती पाण्याच्या वायब्रेशन चा अंदाज घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करतात. ) पिल्ले पाण्यात दिसेनाशी होईपर्यंत बघणे हा फारच रोमांचकारी अनुभव होता. मग तज्ञ कासव मित्र उपाध्ये नी कासव मादी चे अंडी घालण्या पासून ते अंडी कशी संवर्धन केली जातात याची विस्तीर्ण माहिती दिली. वेळास समुद्र किनार्याचे सौंदर्य डोळयात साठवत आम्ही विश्रांति साठी घरी आलो.
![]() | ||
| (वेळास चा नितांत सुंदर किनारा ) |
![]() | |
| (इवली इवली पिल्ले ) |
दुपारी उन्हे कमी झाली की बाणकोट किल्ला आणि खाडीवर मगरी बघायला जायचे ठरले. आम्ही निघायच्या तयारीत असताना होडीवानाचा फोन आला की भरतीचे पाणी अजून ओसरले नाहीय ..मग आंजरले समुद्र किनारा आणि कड्यावरचा गणपतीचे दर्शन असा नवीन प्लान ठरवून निघालो. एका बाजूला अथांग समुद्र , एका बाजूला नदी व खाडी असलेले निसर्गरम्य गाव ! या आंजरले समुद्र किनारी अभिनय केळस्कर यांच्या १५० वर्षे जुने बंगल्याचे दर्शन घेण्याचा योग उपाध्ये यांच्या मुळे आला . पुरातन शिसवी फर्निचर,उठावदार आकर्षक टाईल्स यावरुन वास्तूचे वय लक्षात येत होते. आंजरले समुद्रावर ही कासवाची घरटी होती. संकष्टीच्या दिवशी योगायोगाने मिळालेल्या कड्यावरच्या गणपती दर्शनाचा लाभ घेऊन आम्ही वेळस ला परतलो. वेळास चा मुक्काम आटोपता घेऊन लॉक डाउन व्हायच्या आत पुणे गाठायचे होते , आजचा कॅन्सल झालेला मगरी दर्शन कार्यक्रम पहाटे करून तिथून श्रीवर्धन आणि मग परतीचा प्रवास असे ठरले.
![]() | ||
| ( १५० वर्षं जुना वाडा ) |
![]() |
पहाटे
उठून आमची आवाराआवरी सुरू होती आणि एकीकडे उपाध्ये चे turtle hatching चे
अपडेट सुरू होते ...ते ही निघायच्या तयारीत असल्याने फोन स्पीकर वर होता ,
पलीकडून कासव पिल्ले मोजणी सुरू होती . २५...५०...७५..... आम्ही चौघे एका
जागी स्तब्ध ..एकमेकाकडे पाहत होतो. आकडा ९२ वर गेला.... कुठे ? उपाध्ये
नी उत्तर दिले ...मारळ किनार्यावर , आम्ही सर्वांनी नुसते एकमेकांकडे
हसून पहिले आणि ओरडलो ....चलो .....😀! उपाध्येंच्या च्या सूचना
आल्या...पिल्ले थांबवता येणार नाहीत ..पटकन निघा. पुढच्या ५ मिनिटात आम्ही
गाडीत बसलो आणि निघालो. बागमांडले फेरी बोटीने पलीकडे वेशवी आणि पुढे ५
मिनिटात मारळ ..गाडीतून उतरून अक्षरशः धावत सुटलो...धापा टाकत पोचलो
तोपर्यन्त मारळ बीच मॅनेजर कानडे काका दोन टब मध्ये पिल्ले घेऊन तयार च
होते. सगळी मिळून ९४ पिल्ले होती.. 😍! आमच्या आनंदाला नुसते उधाण आले
होते.

जवळ
जवळ एक तास आम्ही या पिल्लावळीचे समुद्रात जाण्याचे अवर्णनिय मार्गक्रमण
अनुभवले. सारी पिल्ले तुरुतुरु पाण्यात दिसेनाशी होईपर्यंत हा कासव
महोत्सव आम्ही डोळे भरून पाहिला.
तोपर्यंत ८ वाजले होते आणि आता मात्र आम्हाला भूक लागल्याची जाणीव झाली, पण एवढ्या लवकर जवळपास काही मिळण्याची शक्यता ही नव्हती. कानडे काका म्हणाले तुम्ही बसा थोडावेळ ..मी आलोच! आणि काका चहा चा भलमोठा थर्मास आणि मोठा डबा भरून वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे घेऊन आले. क्या बात है... .समुद्रावर बसून आम्ही मस्त चहा आस्वाद घेतला. तेवढ्यात कांबळे काका उपाध्ये ना सांगू लागले की हरिहरेश्वर मदिरच्या दिशेला एक डोल्फिन मरून किनार्यावर आला आहे. मग काय..आमची पलटण मंदिराच्या दिशेने निघाली. जवळ जाऊन पाहिल्यावर उपाध्ये नी फोटो फॉरेस्ट डिपार्टमेंट ला पाठवून कन्फर्म केला ,तो humpback जातीचा दुर्मिळ डौल्फिन होता, शेपटी मासेमारी जाळ्यात अडकून बिचारा मेला होता.
त्याला थोडे वरच्या बाजूला खड्डा करून पुरले आणि आमचे काही प्रमाणात का होईना डौल्फिन चे दु:ख कमी झाले. हात स्वछ धुवून तोपर्यंत समुद्रावर च्या एकमेव स्टॉल वर आम्ही पोहे आणि कोकम सरबता वर त्ताव मारून हरिहरेश्वराचे दर्शन घेतले पण भरती असल्याने अर्धीच प्रदक्षिणा मारून परत फिरलो. तिथून आम्ही श्रीवर्धन ला गिधाड आणि गरुड समुद्, त्यांची घरटी पाहावयास निघालो. आकाशात जणू गिधाडाची परेड सुरू होती. काही वेळाने नुसत्याच घिरट्या मारून एक एकाचे घरट्यावर लॅंडींग झाले आणि लेन्सेस झूम करून आम्हाला त्यांचे निरीक्षण करायची संधी मिळाली. सगळ्यात नशीब म्हणजे समुद्र गरुडा चे पिल्लू बघायला मिळाले. या पिल्लाची लांबी साधारण २- २.५ फुट असावी असे उपाध्ये कडून समजले, मी काहीशा अविश्वसाने पहिले. तेवढ्यात त्या गरुड पिल्लाने आपले पंख पसरले ..आता मात्र मला पर्याय नव्हता...😊!
![]() ![]() | |||
दुपारी श्रीवर्धन ला लंच करून आम्ही परतीची वाट धरली ....या विचारात की काही न ठरवता अनपेक्षित पणे आलेला हा खरच योग होता जो कदाचित ठरवून ही जूळून आला नसता .......! घरी परतल्यावर ही मोकळे सुंदर समुद्र किनारे आणि लुटुलुटू पळणारी कासव पिल्ले डोळ्यासमोरून जात नव्हती😍.
आज हे प्रवास वर्णन पूर्ण करताना मनाने मी पुन्हा एकदा वेळास ला जाऊन आले.
















Great Deeps
ReplyDelete🌹
DeleteVery nice experience. Keep it up. Saurabh
ReplyDeleteThank u so much saurabh
Deleteek number
ReplyDeleteThank youuuuu doc
Deleteअवर्णनीय वर्णन....मन तुझ्या शब्दांच्या मार्गे फिरुन आले.
ReplyDeleteखुप सुंदर वर्णन दिपा ताई😍😍
ReplyDeleteThank you:)
DeleteChhan👌👌
ReplyDeleteSuperb tai...
ReplyDelete🙏🤩
Deleteमस्तच..!!!
ReplyDeleteजरूर भेट देईन.. 👍
Thank you 👍
DeleteNice, interesting 👍. unkfashion.com
ReplyDeleteWell written....nice flow..
ReplyDeleteKeep it up
Khupch chan 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर.. 👌
ReplyDeletekeep travelling, keep learning, keep writing
🙂🙏
DeleteLovely, I had been to Velas last year
ReplyDelete😍Thanks
DeleteMast lihila ahes👍
ReplyDeleteसुंदर, वेळास आणि bolg दोन्ही.👍👍
ReplyDeleteThanks shri😍
DeleteChhan lihile ahes.
ReplyDeleteThank you so much
Deleteखूपच सुंदर वर्णन आणि फोटो आणि ब्लॉग सुध्दा.दीपा keep it up.
ReplyDeleteशामा मावशी. आगाशी.
Thank you 🙏
DeleteWell written. Keep it up
ReplyDeleteThank you 🙏
Deleteअप्रतिम! डोळ्यासमोर आली तुझी मुशाफिरी!!
ReplyDeleteतुझ्याबरोबर प्रवास करायची संधी कधी मिळेल?
Thanks dear...soon..:)
DeleteMast Tai
ReplyDeleteKhup Sunder 👌
Thanks dear:)
DeleteSuperb Deepa tai....mi pan jaun aale tithe...vachatana...khup chaan
ReplyDelete🙏🤩
Deleteअतिशय सुंदर लिहिलं आहेस.. तुझं लेखन आणि फोटो यामुळे आम्हांला देखील तो निसर्ग अविष्कार अनुभवता आला..
ReplyDelete🙏🙂
Deleteअप्रतिम शब्दांकन! दीपा
ReplyDelete🙂🙏
Deleteखूपच छान लिहिले आहेस. आणि फोटो पण मस्त. Keep writing.
ReplyDeleteThanks dear:)
DeleteAmazing keep writing 👍
ReplyDeleteThank you
Deleteखुप छान वर्णन केलंय...मस्त !!
ReplyDeleteखूप छान वर्णन आहे. अगदी संपूर्ण प्रवासाचा फील आला. असेच लिखाण चालू राहू द्या. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
ReplyDeletePhotos and write up both are good.👍 keep travelling and writing!! ☺️
ReplyDelete